नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडियन गॅस एक्सचेंजमध्ये खरेदी करणार 26 टक्के हिस्सा

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई(National Stock Exchange) इंडियन गॅस एक्सचेंज अर्थात आयजीएक्स (Indian Gas Exchange) मध्ये किमान 26 टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी करत आहे. तत्पूर्वी, इंडियन एनर्जी एक्सचेंज (Indian Energy Exchange) ने मंगळवारी गेल इंडिया (Gail India) ने इंडियन गॅस एक्सचेंजमध्ये 5% हिस्सा खरेदी केल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात अदानी टोटल गॅस Adani Total Gas), टॉरंट गॅस (Torrent Gas) ने आयजीएक्समध्ये 5-5% हिस्सा मिळविला.

इंडियन गॅस एक्सचेंज म्हणजे काय?
इंडियन गॅस एक्सचेंज (IGX) हा देशातील पहिला ऑथोराइज्ड गॅस एक्सचेंज आहे आणि तो इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) चा एक भाग आहे. आयजीएक्स हा गॅस ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जो आयईएक्सने 15 जून 2020 रोजी सुरू केला होता आणि डिसेंबर 2020 पासून गॅस एक्सचेंज म्हणून कार्यरत आहे. आयजीएक्स PNGRB द्वारे गॅस एक्सचेंज रेग्युलेशन 2020 अंतर्गत मान्यता प्राप्त आहे.

NSE आणि IGX ची डील पुढील टप्प्यात आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनएसई बोर्डाने या प्रस्तावाला यापूर्वीच मान्यता दिली असून या संदर्भात बाजार नियामक सेबीमध्ये अर्जही दाखल केला गेला आहे. या कराराला पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाकडून (PNGRB) ग्रीन सिग्नलही मिळाला आहे. हा करार पुढील टप्प्यात आहे.

IGX शी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, NSE ची प्रारंभिक योजना स्वतःची गॅस एक्सचेंज स्थापित करण्याची होती, त्यासाठी त्याला सेबीकडून ग्रीन सिग्नलही मिळाला. परंतु आता NSE, IGX मध्ये 26 शेअर्सची खरेदी करण्यावर काम करत आहे.

गॅस एक्सचेंज हा भारतातील गॅसच्या स्पॉट मार्केटला एक पर्याय मानला जातो, जो गॅसमध्ये सुलभ आणि सुरक्षित मार्गाने ट्रेडिंग करण्याची सुविधा देते. सध्या यात सुमारे 15 मेंबर आणि 500 ​​हून अधिक रजिस्टर्ड क्लायंटस आहेत. हा प्लॅटफॉर्म 1 पेक्षा अधिक लोकांना स्पॉट आणि फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये खरेदी-विक्री करण्याची अनुमती देते. हे सध्या गुजरातमधील हजीरा आणि दहेज तसेच आंध्र प्रदेशमधील केजी बेसिन या तीन फिजिकल हबमध्ये कार्यरत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like