देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या दावणीला – राष्ट्रवादी काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | जनतेमध्ये लोकाशाहीवरचा विश्वास निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न आहे. मात्र देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

व्हीपॅटच्या ५० टक्के मतमोजणी करण्यासाठी विरोधकांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली. यासोबतच लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना आचरसंहितेचे उल्‍लंघन केल्‍याच्या आरोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने आतापर्यंत तब्‍बल ९ वेळा क्‍लीन चिट दिली असल्याचे वृत्तदेखील समोर आल्याने राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला चांगले धारेवर धरले आहे.

या पार्श्वभूमीवर ट्‍विटरची मालिका करत राष्ट्रवादीने म्हटले की, व्हीव्हीपॅट व निवडणूक मशीन यात तफावत होण्याची शक्यता असतानाही निवडणूक आयोगाकडून यावर मार्ग काढण्यात आलेला नाही, यातून निवडणुकीच्या निकालादरम्यान घोळ होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

९ हजार कोटींचा खर्च करून व्हीव्हीपॅट यंत्रणा उभारण्यात आली आहे, त्याबाबत लोकांच्या मनात शंका असल्यास ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे, मात्र हे सरकार यात सक्रीय नाही. असा आरोप राष्ट्रवादीने ट्विट करत सरकारवर केला आहे.

Leave a Comment