हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अद्याप त्यांच्याविषयी पुरेशी माहिती अथवा ज्ञान लोकांना नाही. कारण आजपर्यंत त्यांच्यावर टेलिव्हिजन जगतात कोणतीही मालिका झालेली नाही. हा हे नक्कीच खरं कि, अनेक मालिकांमध्ये नवनाथांचा उल्लेख सन्मानपूर्वक आदराने केला जातो, मात्र नीटनेटकी माहिती दिली जात नाही. त्यामुळे अनेकांना नवनाथांच्या मोहिमेची कल्पनाच नाही. यामुळे सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनवर नवनाथांच्या महिमेचे भाष्य करणारी मालिका येणार आहे. जिचे नाव ‘गाथा नवनाथांची’ असे असणार आहे. ही मालिका येत्या २१ जून २०२१ पासून सोमवार ते शनिवार, सायंकाळी ६:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
https://www.instagram.com/p/CP3Fh2TpX-q/?utm_source=ig_web_copy_link
आपण सारेच जाणतो कि, कलयुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपांमध्ये अवतार घेत जगाचा उद्धार केला. मात्र याव्यतिरिक्त नवनारायणांनी नाथरुपात अन्य काय लीला घडवून आणल्या याविषयी आपण गाथा नवनाथांची या मालिकेतून जाणून घेणार आहोत. या मालिकेत मच्छिन्द्र नाथांच्या भूमिकेत अभिनेता जयेश शेवाळकर दिसणार आहे. तर अनिरुद्ध जोशी हा अभिनेता गोरक्ष नाथांची भूमिका साकारणार आहे.
https://www.instagram.com/p/CP2vCeXAhL-/?utm_medium=copy_link
इतकेच नव्हे तर अभिनेता व उत्तम नर्तक असणारा नकुल घाणेकर यासह अभिनेता शंतनू गंगणेे, मनोज गुरव, अक्षय पाटील, हे कलाकारही या मालिकेतील मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
https://www.instagram.com/p/COAqGXkJEjT/?utm_source=ig_web_copy_link
सोनी मराठी वाहिनी घेऊन येत असलेली गाथा नवनाथांची हि मालिका संपूर्णतः पौराणिक आहे. त्यामुळे या पौराणिक मालिकेत दाखविलेल्या त्या काळाला साजेसे असे नेपथ्य तसेच कलाकारांचे विशेष लक्षवेधक पेहराव हे अत्यंत भव्यदिव्य आणि मुळात पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणे निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण या मालिकेतून कधीही न उलघडलेल्या नवनाथांच्या महिमेचे दर्शन महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. या मालिकेचे प्रोमो सुरु झाल्यानंतर या मालिकेविषयी सर्व प्रेक्षक वर्गाला उत्सुकता वाटू लागली आहे.