क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस? नवाब मलिकांच्या ट्विटने पुन्हा खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग केस प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. आता नवाब मलिक यांनी आपला मोर्चा समीर वानखेडे यांची म्हेवणी आणि क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकर हिच्याकडे वळवला आहे. हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी याबाबत ट्विट केलं आहे की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत.

यापूर्वी जाती वरून देखील केला होता आरोप-

नवाब मलिक यांनी यापूर्वी समीर वानखेडे यांच्या धर्मावरून निशाणा साधला होता. समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला तसेच लग्न सर्टिफिकेट ट्विटर वर शेअर केले होते.

You might also like