ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे; वाढदिवसानिमित्त राऊतांना मलिकांच्या शोले स्टाईल शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा आज वाढदिवस असून अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी संजय राऊतांना शोले स्टाईल मध्ये हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

नवाब मलिक यांनी ट्विट करत शोले चित्रपटातील अजरामर  ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’, या गाण्याचा उल्लेख करत मलिक यांनी संजय मलिक यांच्याशी असलेले आपले मैत्रिपूर्ण संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे’, हॅप्पी बर्थ डे संजय राऊतजी, अशा शब्दात शुभेच्छा देत मलिक यांनी राऊत यांच्यासोबतची मैत्री कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटला अनेक अर्थ आहेत. मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात सुरू केलेल्या लढाईत त्यांना संजय राऊत यांचीही साथ लाभत आहे. त्यामुळं हे दोन्ही नेते अधिक जवळ आले आहेत. त्याचं प्रतिबिंब मलिक यांच्या ट्वीटमध्ये पडलं आहे.