Nazara Tech. च्या शेअर्सद्वारे मोठ्या कमाईची संधी, गेल्या 5 सत्रांमध्ये झाली 40 टक्क्यांनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या Nazara Tech. कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी (2 ऑगस्ट रोजी) जोरदार वाढ झाली आहे. आज ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ होऊन तो 727 रुपयांवर पोहोचला. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर सुमारे 40 टक्क्यांनी वाढला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजनेही म्हंटले की येणाऱ्या काळात हा शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करेल.

Nazara Technologies IPO – Here's how you can check the share allotment  status | Business Insider India

जेफरीजच्याने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की,”आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत, Nazara Tech. ने वार्षिकरीत्या 70 टक्के वाढ नोंदवली आहे. यामागील कारण ई-स्पोर्ट्स आणि अधिग्रहण आहे. ई-स्पोर्ट्समधील वाढीचा दृष्टीकोन अजूनही मजबूत आहे. Kiddopia मध्येही दरवाढ फायदेशीर ठरली पाहिजे. जून 2022 च्या Nazara Tech.च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे Nazara Tech. मधील 10.03% हिस्सा आहे.

Nazara gets INR 180 crore investment from Jhunjhunwala: Report - Inside  Sport India

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, जेफरीजने Nazara Tech.च्या शेअर्सना BUY रेटिंग दिले आहे. यावेळी त्याची टार्गेट प्राईस 780 रुपये देण्यात आली आहे. जेफरीजने आपल्या नोटमध्ये असेही लिहिले आहे की, “ई-स्पोर्ट्सने वार्षिक आधारावर 77 टक्क्यांची प्रभावी कमाई वाढ केली आहे. NodeWin चा महसूल देखील वर्षभरात 68 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स-कीडाच्या महसुलातही वार्षिक आधारावर 103% वाढ झाली आहे. स्पोर्ट्स-कीडाचा महसूल दुपटीने वाढला आहे.”

Rakesh Jhunjhunwala-backed Nazara Tech arm acquires 100% stake in  merchandising retailer Planet Superheroes | Mint

Nazara Tech. च्या शेअर्समध्ये मंगळवारीही वाढ झाली आहे. Nazara Tech.आज ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ होऊन तो 727 रुपयांवर पोहोचला. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर सुमारे 39.15 टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या एका महिन्यात हा शेअर 10.49 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, जर आपण गेल्या सहा महिन्यांकडे पहिले तर या कालावधीत या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा शेअर जवळपास 41 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे हा शेअर एका वर्षात 24 टक्क्यांनी घसरला आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://corp.nazara.com/

हे पण वाचा :

Kisan Credit Card द्वारे स्वस्त दराने कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज !!!

ED ची मोठी कारवाई : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा 

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज नरमाई !!! नवीन दर तपासा

T20 World Cup नंतर ‘हे’ दिग्गज या फॉरमॅटमधून घेऊ शकतात निवृत्ती !!!

PNB कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ !!!