पवार साहेबांना सोडून गेलेल्यांची काय गत झाली बघा ; अजितदादांचा पिचड पिता-पुत्रांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही लोक साहेबांना (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) आणि मधुकर पिचड या पितापुत्रांना टोला लगावला आहे.अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, प्राजक्त, अहमदनगरमधील सगळ्या जिल्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष दे रे, माझ्या बारामतीला नंतर लक्ष दिलंस तरी चालेल, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर मिश्किल भाष्य केलं. राहुरीला जास्त मिळणार यात शंकाच नाही. पण वाढपी कशामुळे निवडून आला, तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अहमदनगर अशा सगळ्या मतदारसंघांमुळे. प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. पण सगळ्यांना वाटलं पाहिजे, राहुरीसारखं आमच्याकडेही लक्ष देतोय” असं अजित पवार हसत म्हणाले.

नाही तर माझाच मामा व्हायचा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरे यांचे नात्याने मामा आहेत, त्यावरही अजित पवारांनी मिश्किल भाष्य केले. मामाची विकास निधीसाठी मदत घ्या, नाही तर माझाच मामा व्हायचा, असं म्हणत अजित पवार हसले. महाविकास आघाडीचे जे जे नेते येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment