कारणे सांगू नका, माझ्या गतीने काम करा; अजितदादांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्य आणि दमदार कामासाठी ओळखलं जातात. आजही त्यांनी अगदी सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात केली. अगदी सकाळी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असं अजित पवार यांनी म्हटलं.
मला कोणतीही कारणे सांगू नका, दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा. लागेल तिथे सहकार्य करु. रस्त्याच्या बाजूच्या घरांना पर्यायी जागा द्या. कुणी पेताड खाताड आला तर उद्योग होईल. आपल्या प्रत्येक नागरीकाचा जीव महत्वाचा आहे, असंही अजितदादा म्हणाले.
वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून आपण बारामतीकरांना सोई सुविधा उपलब्ध करत आहोत. बारामतीकर सहकार्य करत आहेत म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून विकास करु शकतो. सध्या शहरांत विविध विकासकामे सुरु आहेत. निधी कमी पडल्यास पुरवणी मागण्यात तरतूद करु, असंही अजितदादांनी बारामतीकरांना सांगितलं.