तू बोलतो किती? तुझी औकात किती? नाव न घेता अमोल मिटकरींचा पडळकरांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विखारी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली राष्ट्रवादीचे नेते असून पडळकरांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता टीका केली.

अमोल मिटकरी म्हणाले, “तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, मी नागज फाट्यावर दारू विकली नाही किंवा कोणत्या आजीची दोन कोटींची जमीन बळकावली नाही. मी कुत्र्यांना भीत नाही”, असा घणाघात मिटकरी यांनी केला. “तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असतं. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो”, असा टोला त्यांनी लगावला.

नक्की काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर –

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवार भ्रष्टाचारी असून अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पवारांचे हात लागता कामा नयेत असे पडळकर म्हणाले होते.