चर्चा पालकमंत्र्यांच्या बॅनरची! बाळासाहेब पाटील यांचा 50 फुटी पोस्टर वेधतोय कराडकरांचे लक्ष

अक्षय पाटील | कराड प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा नुकताच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत कराड सोसायटी गटातून विजय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब पाटील यांचा उभारलेला विजयी बॅनर सध्या जोरदार चर्चेत आहे.

कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात बाळासाहेब पाटील यांचा तब्बल 50 फुटी बॅनर उभारण्यात आला आहे. अतिशय उंच असा हा बॅनर सर्व लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. जिल्हा बँक निवडणूक बाळासाहेब पाटील यांनी मिळवलेल्या दिमाखदार विजयाच्या पार्श्वभूमीवर समर्थकांकडून हे लक्षवेधी कटआऊट उभारण्यात आले आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा बँक निवडणूकीत कराड सोसायटी गटातुन दमदार विजय मिळवला. बाळासाहेब पाटील यांना 74 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर याना 66 मते मिळाली. बाळासाहेब पाटील यांना या निवडणुकीत भोसले गटाची साथ मिळाल्याने आगामी निवडणूकीत नवीन राजकीय समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतात.