वाढदिवस विशेष । शरद पवार – संघर्षाच्या वाटेवरील एक अपराजित योद्धा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार हे फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक मोठं आणि महत्त्वाचे नाव…. प्रचंड अभ्यास, शेतीविषयक असलेलं ज्ञान, पक्षातील आणि विरोधकांशी देखील असलेले सलोख्याचे संबंध, लढाऊ वृत्ती, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पवारांना राजकारण महत्त्व प्राप्त करून देतात. शरद पवार कधी काय करतील हे सांगता येत नाही….. त्यांच्या प्रत्येक वाक्यांचे 3-4 अर्थ तरी सहज निघू शकतात….त्यामुळे पवारांचा अंदाज बांधणे हे भल्याभल्यांना जमलं नाही. जे अशक्य आहे त्या गोष्टी पवार लीलया करू शकतात.

पवारांची राजकीय ताकद कधीही आकड्यांवरून मोजली गेली नाही…म्हणूनच फक्त 4-5 खासदार असले तरी पवारांचे राजकारणातील महत्त्व थोडंही कमी झालं नाही, उलट दिवसेंदिवस पवारांचे राजकीय महत्त्व आणि पावर वाढतच चालली आहे. काहींना तर त्यांच्यावर Phd करावी वाटते पण खरं तर पवार साहेब phd करून सुद्धा न समजणारा विषय आहे. उद्योग, कला,क्रीडा, साहित्य,सहकार,शेती, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रातील त्यांना ज्ञान आहे आणि त्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे..

राजकारण करत असताना पवार साहेबांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत ही मैत्री जपली गरजेच्या वेळी त्यांना मदत केली ती करत असताना असा कधीही विचार केला नाही की तो कोणत्या पक्षाचा कोणत्या राज्याचा नेता आहे याच सर्वात मोठ्ठ उदाहरण पंतप्रधान मोदी आहेत.ज्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी सहसा दिल्लीत त्यांना कोण मदत करायला तयार नसायचं पण पवार साहेबांनी त्यांना ती वेळोवेळी मदत केली.अस म्हणतात सरकार कोणाचही असुद्या शरद पवारांच्या विरोधात कोणत्याही फाईल वरती सही होऊद्या तिची शाई वाळायच्या अगोदर ती बातमी पवारांपर्यंत पोहचलेली असते याच कारण हेच की त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी जपलेली मैत्री त्यांच्यावर अडचणीच्या काळी केलेलं उपकार..

लातूरचा भूकंप असेल, महिलांना दिलेलं आरक्षण असुद्या,देशाच्या इतिहासातील पहिली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी असुद्या,महाराष्ट्रातील हे कोणाच्या मनीध्यानी नसताना भाजपच्या विरोधात जाऊन अस आणलेल सरकार असुद्या त्यातून चाणक्य अशी नवी ओळख बनवू पाहणाऱ्या अमित शहाना दिलेला शह असुद्या शरद पवारांनी तेच केलंय जे आजवर कोणालाही जमलं नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने 105 आमदार निवडून आणले आणि सर्वात मोठा पक्ष ठरला पण तरीही त्यांना विरोधीपक्षात बसावं लागलं.अगदी जिथे दोन अंकी आमदार नाहीत तिथेही भाजपने सत्ता आणि पैशाचा वापर करून सत्ता खेचून आणली पण हे त्यांना महाराष्ट्रात मात्र करता आलं नाही.हे फक्त आणि फक्त पवार साहेबांचा मत्सुद्दीपणा, चातुर्य,विविध पक्षातील लोकांना एकत्र करण्याचं कसब यामुळेच.

महाराष्ट्रातील कोणताही प्रश्न असो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कष्टकर्यांचा प्रश्न असो, शिक्षणाचा प्रश्न असो, खेळाचा प्रश्न असो , त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे शरद पवार…. महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न म्हणजे शरद पवार साहेब…… अशा या महाराष्ट्राच्या सुपुत्रास हॅलो महाराष्ट्र परिवाराकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा… त्यांना खूप आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like