‘निसर्गग्रस्त’ कोकण वासियांच्या मदतीसाठी शरद पवारांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसीय पाहाणी दौरा केला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, असं शरद पवार यांनी पाहाणी दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं आहे. यावेळी त्यांनी खालील सूचना केल्या

१)चक्रीवादळात अनेक झाडांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु असून ‘यंत्रणा अजून सगळीकडे पोहचली नाही, आताचा अंदाज प्राथमिक अंदाज आहे. कोकणात नारळ, सुपारीबरोबर मसाल्याची पिकंही घेतली जातात, त्यांचंही नुकसान झालं आहे, त्यांसाठी मदत करावी लागेल. सांगली, कोल्हापूर पुरावेळी सरकारने काही धोरणात बदल केले होते, त्यातही यावेळी बदल करावे लागतील. शेती, घरं, व्यवसाय याच्या मदतीच्या निकषात बदल करायला हवेत, तसं सरकारला सूचवणार आहोत.’ असं शरद पवार यांनी म्हटलं.

२)बागांच्या नुकसानीसाठी मदत देताना पुढील ६ ते ७ वर्षांचा विचार करुन द्यावा लागेल. कारण हे पिक एका दिवसात उभं राहत नाही, यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलणार असल्याचंही पवार म्हणाले.

४)रोजगार हमीतून फळबागा असा कार्यक्रम राबवला होता, आज बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा जुनी रोजगार हमी योजना राबवता येऊ शकते. कारण बागा साफ करायलाही त्याच्याकडे पैसा नाही.

५)राष्ट्रीयीकृत बँकाचं कर्ज काढल्याचं अनेक लोकांनी सांगितलं आहे. अशा कर्ज काढलेल्या लोकांची, गावांनी यादी करावी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीकडे द्यावी, यानंतर केंद्राची मदत घेऊन बँकांसमोर हा विषय मांडता येऊ शकत, असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

६)मत्स्य व्यवसायाची स्थितीही बिकट आहे, कोरोनामुळे २ महिने व्यवसाय थांबला होता. आता वादळात बोटी, जाळी, इंजिनाचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत करायला हवी, त्याबाबतही राज्य सरकारशी बोलणार असून, या संकटातून यातून आपण बाहेर पडू, सरकार मदत करेल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment