“ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद सगळ्यांना माहित आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण राजकारणापलीकडे जाऊन या बहीण भावांमधले नातेसुद्धा लोकांनी पहिले आहे. भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्या व्हिडिओवर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा आहेत. या सदिच्छा त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिल्या आहेत.

“योग्य उपचार आणि काळजी घ्या”
धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा संदर्भ देत हे ट्विट केले आहे. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणं आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचं समजलं. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेनं लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो”, अश्या सदिच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत. तसेच प्रीतम मुंडे यांनीसुद्धा भावाच्या सदिच्छांचा स्वीकार करत “धन्यवाद!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रीतम मुंडेंनी पोस्ट केला होता व्हिडिओ!
खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लोकांना आवाहन करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये प्रीतम मुंडे यांनी “गेल्या आठवड्यात १४ ते १८ एप्रिलमध्ये जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. १८ तारखेला मुंबईत आल्यानंतर मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा हि लक्षणे जाणवायला लागले. २१ तारखेला मी RTPCR चाचणी केली. पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण सगळ्यांना मी आवाहन करते की फक्त RTPCR चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला कोरोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणे असतील, तर त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून घेत आहे” असे आवाहन केले आहे.

Leave a Comment