ईडीची नोटीस आल्यानंतर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं खडसेंनी सांगितलं जात आहे. खरं तर हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंबंधी माहिती देताना अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आपल्याला नोटीस येणार असल्याची माहिती मिळाली असल्याचंही सांगितलं आहे. मला अनेक सुत्रांकडून नोटीस येणार असल्याचं कळालं आहे. जिथपर्यंत मला कळालं आहे ही नोटीस पुण्यातील भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आहे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. “ख्रिसमसची सुट्टी असल्याने कदाचित नोटीस अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेने नोटीस पाठवली तरी मी चौकशीला सामोरं जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याचं कारणच नाही,” असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

माझ्याविरोधात सुरु असलेल्या चौकशांमुळे आश्चर्य वाटत आहे. मला नेहमी वाटायचं की ईडी १०० कोटी किंवा त्याहून अधिकच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालतं. जर हे पुणे जमीन प्रकरणाबद्दल असेल तर त्यात चार कोटींहून कमी व्यवहार आहे. ज्या जमिनीबद्दल चर्चा आहे ती माझी पत्नी आणि जावयाने विकत घेतली होती. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आहे,” असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment