“विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”- हसन मुश्रीफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । “विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”, असं थेट आव्हान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मिश्रीफ यांनी दिलं आहे. मुश्रीफ यांनी आज (22 ऑक्टोबर) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली.

“आम्ही अनेक वर्ष राज्य कारभार केला आहे. जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला चांगलं माहित आहे. आमची जनतेशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आता आम्ही काय करावं, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही”, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. “नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केल्याशिवाय मदत देता येत नाही. पंचनामे केल्याशिवाय सरकारला किती मदत द्यायची, याचे आकलन होत नाही. विशेष म्हणजे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे, असा केंद्र सरकारचादेखील आग्रह असतो”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

“गेल्या वर्षी कोल्हापूरला महापूर आला तेव्हा ६ दिवसांनी देवेंद्र फडणवीस आले होते. ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस सांगली-कोल्हापुरात त्यांच्याविरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपची एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वतः कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली”, असा चिमटाही मुश्रीफ यांनी काढला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment