चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे ; हसन मुश्रीफ यांची संतप्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर टीका करताना आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे अस म्हणत हसन मुश्रीफ यांनी आपला संताप व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे. दादांनी आधी छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांना तंबी दिली होती. हे बरोबर नाही. दादांवर आता चांगलं कार्टुन आलं आहे. आपलं हसं होऊ नये म्हणून दादांनी आता अशी वक्तव्य करणं टाळावं, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले –

अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा पाटील चंद्रकांत पाटील यांनी दिला. तुम्हाला राष्ट्रवादीचे 28 आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं. तसेच अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.