निरव मोदी आणि मेहून चोक्सीचे मोदींबरोबर चांगले संबंध असल्यामुळे कारवाई नाही; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेहुल चोक्सी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. ते आज कोल्हापूर येथे पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांवरही कारवाई केली जात नाही, असं सांगतानाच चोक्सीला अटक केल्यानंतर देखील आपली तपास यंत्रणा हात हलवत परत येणार हे मला माहीत होतं, असं धक्कादायक विधान मुश्रीफ यांनी केलं आहे.

चोक्सीला आणण्यासाठी भारतातून एक आठ सदस्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. मात्र, डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीच्या प्रकरणावरील सुनावणी स्थगित ठेवली. त्यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकलं नाही. परिणामी भारतीय पथकाला परत यावं लागलं आहे. चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. सीबीआय या दोघांविरुद्ध चौकशी करत आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment