हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या काळात उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाची दुसरी लाट उत्तमरित्या हाताळली. लसीकरण मोफतरित्या उपलब्ध करुन दिली असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना टोला लगावला आहे.
उत्तर प्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारने कोविडची परिस्थिती चांगली हाताळली असलं म्हटलं जात असेल तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार मी करतोय असे जयंत पाटील यांनी म्हंटल
उत्तर प्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारने कोविडची परिस्थिती चांगली हाताळली असलं म्हटलं जात असेल तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार मी करतोय ! #PMinKashihttps://t.co/hKr6wBl8ov
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 15, 2021
दरम्यान उत्तर प्रदेश मध्ये कोरोनाची भयानक परिस्थिती पाहायला मिळाली होती. कोरोनामुळे रुग्णांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानं मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडली. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन केले. सरकारने मनाई केल्यानंतरही लोकांनी गंगेच्या काठावर मृतदेह पुरले. . त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारवर टीकाही होत होती.