‘काना मागून आला आणि तिखट झाला’ ; जयंत पाटलांची नाव न घेता फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये खडसेंचं स्वागत केलं तर भाजपवर निशाणा साधला. भाजमध्ये खडसेंनी आपलं मोठं योगदान दिलं पण काना मागून आला आणि तिखट झाला असा टोला जयंत पाटील यांनी नाव न घेता फडणवीसांना लगावला आहे.

जयंत पाटील म्हणाले, ‘पक्षामध्ये खडसेंवर अन्याय झाला. त्यांनी मुंडेच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. एकनाथ खडसेंना त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत न्याय करेल असं वाटत होतं. मात्र, तसं झालं नाही. त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंसह पक्ष वाढवला आहे.’

महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सुडाच राजकारण याच्या अगोदर कोणी केलं नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत कोणीही असलं राजकारण केलं नाही. पण मागील 5 वर्षांपासून भाजपने असले राजकारण चालू केल.खडसेसाहेबांवर अन्याय झाला, कटकारस्थानं रचली गेली असतील. खडसेंच्या अन्यायबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहात प्रश्न विचारला होता, कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है,असं जयंत पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’