Monday, January 30, 2023

छगन भुजबळ ईडी प्रकरणात न्यायालयासमोर हजर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांवर एनसीबीच्यावतीने चौकशी करीत कारवाई केली जात असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ईडी प्रकरणात न्यायालया समोर हजर झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध ईडीने मुंबई पोलिसांच्या फिर्यादीच्या आधारे काळा पैसा बाळगल्याप्रकरणी 17 जून, 2015 रोजी मनी लाँडरिंगचे दोन गुन्हे दाखल केले होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामातील भ्रष्टाचार, कलिना येथील जमीन हडप करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

आज या प्रकरणात न्यायालयाने भुजबळ यांना उपस्थित राहण्यास बजावले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर भुजबळ हे आज मुंबई सत्र न्यायालयात ईडी प्रकरणाबाबत न्यायालयासमोर हजर झाले. भुजबळांना 2016 मध्ये ईडीने मनीलाँड्रींग गुन्ह्यात अटक केली होती. याप्रकरणी आज सुनावणी घेण्यात येत आहे.