बाळासाहेबांचं मंत्रालयावर भगवा फडकविण्याचं एक स्वप्न पूर्ण, दुसरं आम्ही पूर्ण करु!- छगन भुजबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ”मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मराठी माणसाचं पाऊल पुढे नेण्याचं दुसरं स्वप्नही आम्ही पूर्ण करु,” अशी भावना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलं. बाळासाहेबांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त भुजबळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलते होते. (Balasaheb Thackeray death anniversary)

“बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे स्मृतिस्थळावर आलो आहे. यावर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न नियती आणि जनतेने पूर्ण केलं आहे. यामुळे यंदा विशेष महत्त्व आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. बाळासाहेबांचं आणखी एक स्वप्न होतं, की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं पाहिजे, हे आम्ही पूर्ण करु” अशा भावना भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी व्यक्त केल्या आहेत.

“मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांची कुंचल्याने भंबेरी उडविणारे ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला” असे लिहित भुजबळांनी ट्विटरवरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment