Monday, February 6, 2023

गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता? हे कसले हिंदुत्ववादी?; छगन भुजबळांचा सवाल

- Advertisement -

नाशिक । ‘हिंदुत्व आणि राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता? हे कसले हिंदुत्ववादी?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. (chhagan bhujbal slams bjp over hindutva)

नाशिकमध्ये टीव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपच्या अध्यात्मिक सेलने मंदिर उघडण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावरही टीका केली. मंदिरं खुली केली नाहीत म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी चुकीची आहे. केवळ भाजपच सत्तेत राहू शकते का? इतरांना सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही का?, असा सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

अनेक राज्यांमध्ये अजूनही मंदिरे उघडण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे, असं सांगतानाच सर्व उपाययोजना करूनच राज्यातील मंदिरं खुली केली जाणार असल्याचे संकेतही भुजबळ यांनी यावेळी दिले. भुजबळ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेरले. हे कसले हिंदुत्ववादी आहेत. इथे गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता. हेच का तुमचं हिंदुत्व, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in