कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का ; धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या नंतर कोल्हापुरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

धनंजय महाडिक यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा मजकूर अद्याप गुलदस्तात आहे. मात्र धनंजय महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेला पुन्हा एकदा जोर चढला आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या धनंजय महाडिकांचा संजय मंडलिकांनी चांगलाच पराभव केला. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले असावे. धनंजय महाडिक भाजप मध्ये जाण्याच्या चर्चा लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील रंगल्या होत्या. मात्र भाजपमध्ये जाण्याआधीच राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला होता. मात्र या चर्चा आता पुन्हा रंगात आल्या आहेत.

Leave a Comment