कन्येनंतर एकनाथ खडसेंनाही झाली कोरोनाची लागण; उपचारासाठी मुंबईकडे रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही खडसे यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली होती.

रोहिणी खडसे यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रकृती उत्तम असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. (Former Minister Eknath Khadse Infected With Corona)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment