विरोधी पक्षनेते जरा उशीराच जागे झाले; जयंत पाटलांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीची भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दोन दिवसांपासून पाहणी केली जात आहे. त्यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला. “विरोधी पक्षनेते जरा उशीराच जागे झाले. महापुरानंतर प्रस्थान केले असते तर त्यांना महापुराची भीषणता लक्षात आली असती, असा टोला पाटील यांनी लगावला.

यावेळी ते म्हणाले की, ” मराठवाडा व विदर्भात अतिवृष्टीमुळे सध्या नुकसान झाले आहे. आता नुकसानीनंतर दोन दिवसांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडून गावात जाऊन अतिवृष्टीची माहिती घेतली जात आहे. मात्र, ते जरा उशिराज जागे झाले आहेत. महापुराच्यावेळी जी परिस्थिती होती त्यावेळी त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणीकेली असती तर त्यांना समजले असते, असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरून व भरपाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान फडणवीस व दरेकर यांच्या दौऱ्यावरून मंत्री पाटील यांनी निशाणा साधला.

Leave a Comment