भाजपचे प. बंगालमधील 200 +चे स्वप्न भांगताना पाहून खूप वेदना झाल्या; राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी सुरवात झाली. पं. बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस 200+ जागांवर सध्या आघाडीवर आहे तर भाजप 90 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे प. बंगालमधील 200 +चे स्वप्न भांगताना पाहून खूप वेदना झाल्या अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्याने दिली आहे.

चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भांगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प.बंगाल मध्ये आले,मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. 4 वरून 84 वर जागा आल्या हे राज्यातील भाजपा नेत्यांना बोलायला जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिली आहे. ट्विटरवरुन मिटकरी यांनी आपले हे मत नोंदवले आहे.

दरम्यान, विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला आज होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या.

हे पण वाचा –

पश्चिम बंगाल ः ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारे सुवेंदू अधिकारी कोण?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शाहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल – संजय राऊत

दिशा पाटनी सोबतच्या Kissing सीनवर सलमान खानचा मोठा खुलासा; म्हणाला…(Video)

नंदीग्राम मध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

येथे फक्त 50 रुपये जमा करून तुम्ही करू शकता 50 लाखांची कमाई, ‘ही’ योजना काय आहे ते जाणून घ्या

Leave a Comment