संपूर्ण देश एकजूट आहे, किती लोकांना मोदीजी अटक करणार ते बघुयाच ; नवाब मलिक यांचं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे कोरोनाने चिंता वाढवली असताना दुसरीकडे कोरोना लसीवरून राजकारण अजूनही सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा लसीवरून केंद्र सरकार वर हल्लाबोल केला आहे. परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी भाजपला केला.

देशातील लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रबसरकारची कायरता असून संपूर्ण देश एकजूट आहे किती लोकांना अटक करताय बघुया, असे आव्हानही नवाब मलिक यांनी भाजपला दिले. सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्रसरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करुन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय किती लोकांना अटक करणार मोदीजी असा संतप्त सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

डाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस परदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्र सरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी लसी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment