माझा अनिल देशमुख करण्याचा केंद्रीय तपास यंत्रणेचा डाव; मलिकांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अजून एक गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच केंद्रीय तपास यंत्रणा खोटी माहिती देवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत आपण याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हंटल.

नवाब मलिक म्हणाले, “अनिल देशमुख यांच्याविरोधात ज्या पद्धतीने खोटी तक्रार करून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली, तसंच माझ्याबाबत केलं जातंय. माझ्या हाती याविषयी पुरावे लागले आहेत. केंद्रीय यंत्रणांचे काही अधिकारी स्वतः लोकांना माझ्याविरोधात मसुदा तयार करून पाठवत आहेत. त्यांना ईमेल आयडी देत आहेत. त्यांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. याचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

याप्रकरणी अमित शहा यांना पत्रं लिहून तक्रार करणार आहे. मला अडकवण्याचा डाव करणार असाल तर मी घाबरणार नाही. राज्याच्या मंत्र्यांना फ्रेम करण्याचा हा मोठा डाव आहे. एक अनिल देशमुख झाले, आता मला फ्रेम करून दुसरे देशमुख करण्याचा डाव आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

You might also like