नवाब मलिकांचे खळबळजनक ट्विट; समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार???

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान नवाब मलिक यांनी अजून एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांनी रात्री उशिरा समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाह चा फोटो शेअर केला आहे.

हा फोटो पोस्ट करतानाच मलिक यांनी ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देखील दिले आहे. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी पुन्हा एकदा केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला शेअर केला होता, ज्यात त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असा होता.

You might also like