फडणवीसांचा चांगला गुण कोणता? नवाब मलिक म्हणतात…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आक्रमक झाले होते. नवाब मलिक यांनी ड्रग प्रकरणावरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपही मात्र एका कार्यक्रमात बोलताना नवाब मलिक यांना फडणवीसांचा चांगला कोण कोणता याबाबत विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील चांगला गुण कोणता, असा प्रश्न नवाब मलिक यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस लोकांशी चांगले संबंध ठेवतात. माणसांशी कनेक्ट होणं हा त्यांच्यातील चांगला गुण आहे. मी एकदा त्यांना डिनरला बोलावलं होतं. त्यावेळी ते आले होते. ते माणसांसोबतचं नातं उत्तमपणे जपतात, असं मलिक म्हणाले.

जर फडणवीसांना एखादा सल्ला द्यायचा असेल तर नेमका काय सल्ला द्याल असा सवाल नवाब मलिक याना केला असता ते म्हणाले, फडणवीस माणसांशी उत्तम संबंध राखतात, पण याच गुणाचा तोटाही आहे. फडणवीस माणसांशी संबंध व्यवस्थित ठेवतात. मात्र त्यांना माणसं नीट ओळखता येत नाहीत. त्यांना त्यांच्या आजूबाजूला उपरे गोळा करून ठेवले आहेत, असं मत मलिक यांनी मांडलं.