शरद पवार सातारा दौऱ्यावर; रयत शिक्षण संस्थेच्या मासिक आढावा बैठकीस उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा येथे दाखल झाले असून आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय बैठक पार पडत असून याला पवारांनी उपस्थिती लावली आहे.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नुकतीच व्यवस्थापकीय बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीस शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील, खा. श्रीनिवास पाटील, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर उपस्थित आहेत.

संस्थेच्या मासिक आढावा बैठकीनंतर दुपारी 2 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला पवार उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडीवर पवारांकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामतीतून साताऱ्यात पवारांची दमदार एन्ट्री

राजकीय व्यक्ती जेव्हा एखाद्या कार्यक्रमास हजेरी लावतात तेव्हा त्याच्या पहिल्या एन्ट्रीने अनेकजण आकर्षित होतात. शरद पवार यांचीही पहिली एंट्री कायम दमदार असते. आज सकाळी बारामतीतून थेट सातारा येथे पवार यांचे सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.