किरीट सोमय्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाण्याचा घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच थेट आरोप करण्यात आला. सोमय्यांच्या आरोपांनाही पवारांनी उत्तर दिले आहे. “काही लोकांना काहीही बोलण्याची सवय असते. त्यामुळे ती लोक अशा काही लोकांची नावे घेतात कि त्यामुळे ती पुन्हा चर्चेत येतात. अशा प्रकारचा काहीही प्रकार घडला नाही. त्याबद्दल मला माहिती नसल्याचे,” उत्तर पवारांनी दिले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर त्यांच्या आरोपांना आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी महाबळेश्र्वर येथे माध्यमांशी संवाद साधत उत्तर दिले. यावेळी पवार म्हणाले की, अनेकवेळा माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे सर्वानाच माहिती आहे. क्काही लोक हे माझ्यावर जाणूनबुजून आरोप करतात. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यात घोटाळा झाला तसाच घोटाळा हा जालना सहकारी कारखान्यात झाला आहे. खोतकर यांनी मुळे परिवारासोबत हातमीळवणी करून कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तसेच यामागे शरद पवार यांचाही हात असून त्यांच्या आग्रहाने हा रिपोर्ट दाबण्यात आला आहे, असाही आरोप केला आहे.

Leave a Comment