दिल्लीत शरद पवार सोनिया गांधी यांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये विधान परिषद निवडणुकीवरून वादंग सुरु असताना दिल्लीत मात्र, वेगळ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे दिल्लीला गेले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याची भेट घेतली आहे. दोघांमध्ये सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक सुरु असून काही विषयावर चर्चा केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे दिल्लीला गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आजा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ते सध्या गेले असून दोघांच्यामध्ये गुप्त बैठक सुरु आहे. या दोघांच्या भेटीमुळे नवीन राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गाडी याची भेट घेतली होती. यावेळी त्याच्यात अनेक राजकीय विषयावर चर्चाही झाली होती. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी याची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर खासदार उपस्थित आहेत.

Leave a Comment