ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली, त्या आम्हांला हिशोब मागतायत; रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली व त्यांना पक्ष सोडावा लागला, त्या आज आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत अस म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. त्या कर्जत जामखेड येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली व त्यांना पक्ष सोडावा लागला, त्या आज आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत! दोन वर्षांचा हिशेब काय मागता? सत्तर वर्षांचा हिशोब देऊ; मात्र भ्रष्टाचाऱ्यायांनी आम्हाला हिशेब मागू नये, असा टोमणा त्यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल, अशी स्वप्ने विरोधकांना रोजच पडत आहेत. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले हे ज्यांना माहीतच नाही, त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. जो जास्त खोटे बोलेल, त्यालादेखील पद्मश्री पुरस्कार दिला जाईल असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

You might also like