Wednesday, February 1, 2023

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर कशाला बोलू? शरद पवारांनी फटकारले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  महाविकास आघाडीत आमच्या पाठित सुरा खुपसला जात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोलेंना फटकारले आहे. नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी बोलणार नाही अशा शब्दांत पवारांनी नाना पटोलेंना टोला लगावला. शरद पवार यांनी बारामतीतील त्यांच्या माधव बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडीत आमच्या पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना पवारांनी म्हंटल की या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या खोचक टीकेमुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नाना पटोले नेमकं काय म्हणले होते-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे. मला महाराष्ट्र काँग्रेसमय करायचा आहे पण माझा फोन टॅप केला जात आहे. असे म्हणत जर समझोता करायचा नाही आणि सोबत राहून सुरा खुपसायचा असेल तर ते चालणार नाही. असे नाना पटोले यांनी म्हंटल