हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत या भेटीबाबत खुलासा केला आहे.
आज मा. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यावेळी राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाली अस ट्विट शरद पवार यांनी केले.
Met the Hon. Prime Minister of our country Shri Narendra Modi. Had a discussion on various issues of national interest.@PMOIndia pic.twitter.com/AOp0wpXR8F
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आज शरद पवार हे मोदींच्या भेटीला गेले. राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता पवार-मोदी भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.