राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही ; शरद पवारांनी डागली तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर निशाणा साधला.

पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल भेटले आहेत , इथे शेतकरी भेटणार म्हणून राज्यपाल गोव्याला गेले. असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही.

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांची कवडीची आस्था नाही. पंतप्रधान शेतकऱ्यांची विचार पूस करत नाही , हे शेतकरी काही पाकिस्तानमधील आहेत का? असा सवाल करत पंजाबमधील शेतकऱ्यांचं देशासाठी योगदान मोठं आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवारांनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी बांधवांचं स्वागत केलं. ते पुढे म्हणाले, ही मुंबई नगरी ही चळवळीतील मुंबई आहे. संयुक्त महाराष्ट्र लढयात मुंबई नगरी आणि कामगार वर्ग सामील होते. देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहात तुमचे मनापासून धन्यवाद देतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment