आता समीर वानखेडेचा तुरुंगवास निश्चित; नवाब मलिकांचा थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आज एका कार्यक्रमात मलिक यांनी थेट वानखेडे यांना इशाराच दिला. “आपण समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असे मलिक यांनी म्हंटले आहे.

मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक आले होते. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान थेट समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की,समीर वानखेडे या अधिकाऱ्याला मी खुले आव्हान देतो की, वर्षभरात तुरुंगात टाकणारच. आणि वर्षभरात तुझी नोकरी जाईल. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी जनतेसमोर आणणार आहे.

मलिक यांनी यावेळी त्यांच्या जावयाला तुरुंगात टाकल्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, समीर वानखेडे याने माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला सांगत आहे की, माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांगावे, कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? वानखेडे तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’असा इशारा यावेळी मलिक यांनी दिला आहे.

Leave a Comment