फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका, तुमचं सध्याच पदही तितकंच मोठं; नवाब मलिकांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही,’ असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे. फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं आहे,’असे मलिक यांनी म्हंटले आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांना टोला लगावताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद सोडून दोन वर्ष होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूर्वीही अनेकवेळा मी पुन्हा देईन, मी पुन्हा येईन अशी विधाने वापरली आहेत. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही टोला लगावला होता. आता फडणवीसांनी पुन्हा वक्तव्य केले असल्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांना फडणवीस यांना टोला मारायला आयती संधीच मिळाली आहे.

Leave a Comment