जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेत गैर काय??; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. पाटलांच्या या विधानानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. दरम्यान याबाबत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी मोठं विधान केले आहे. जयंत पाटलांच्या इच्छेत काय गैर आहे?? अस म्हणत त्यांनी एकप्रकारे पाठींबाच दिला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजकीय जीवनात काम करत असताना इच्छा आकांक्षा असतात. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला आहे. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय?”, अशी खास प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याबाबत छेडलं असता तेव्हा “उद्या मला वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही” अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like