Wednesday, June 7, 2023

राज ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे ओवेसी; राष्ट्रवादीची जळजळीत टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याबाबत व्यक्तव्या नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर आम्ही भोंग्या समोर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिल्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रसेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण राज ठाकरेंवर निशाणा साधत राज ठाकरे हे महाराष्ट्रातील नवे ओवेसी आहेत अशी टीका केली आहे.

सुरज चव्हाण म्हणाले, औवेसी मुस्लिम समाजाला भडकवण्याचं काम करायचे आणि राज ठाकरे हिंदु समाजाला भडकवण्याचं काम करत आहेत. दोघांचा उद्देश एकच आहे, राज ठाकरे हे महागाई, बरोजगारी अशा मूळ मुद्द्यांना बगल देऊन हिंदु समाजातील तरुणांची माथी भडकवण्याचं ते काम करत आहेत. मात्र महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा हा महाराष्ट्र आहे. अशा विचारांना महाराष्ट्रात थारा दिला जात नाही असे सुरज चव्हाण म्हणाले.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्या वरून राज्य सरकार वर निशाणा साधला होता. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेने राज्यातील वातावरण तापलं आहे.