Monday, February 6, 2023

बिहारमध्ये NDA-महागठबंधनमध्ये ‘कांटे कि टक्कर’; निकालाला होणार विलंब; ‘ही’ आहेत कारणे

- Advertisement -

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे आखून देण्यात आलेल्या नियमावलीमुळे बिहार निवडणुकीचा निकाल लागण्यास उशीर होऊ शकतो.

निकालाची वन डे मॅच होणार टेस्ट मॅच; रिझल्टला होणार विलंब
१) आधी टपाली मतांची मोजणी
मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली आहे. नियमानुसार सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सुरु करण्यात आली आहे. ईव्हीएमच्या एका राऊंडला 15 ते 20 मिनिटे लागतात. त्यामुळेही अंतिम निकाल येण्यास उशीर लागू शकतो.

- Advertisement -

२)मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणूक निकालासाठी 2 ते 3 तासांचा उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदानासाठी एकूण 1 लाख 6 हजार 526 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. जे मागील निवडणुकीच्या तुलनेत 63 टक्के अधिक होते. 2015 च्या निवडणुकीत 65 हजार 367 मतदान केंद्र होते. यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळं ईव्हीएम मशीनच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक निकालाच्या अंतिम घोषणेला उशीर लागण्याची शक्यता आहे.

३)VVPAT सोबत निकालाची पडताळणी
निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार एखाद्या उमेदवारानं मतमोजणीवर आक्षेप घेतला तर अशास्थितीत ईव्हीएम सील केलं जाईल. त्यानंतर मतांच्या संख्येची VVPAT सोबत पडताळणी करुन पाहण्यात येईल. असं झाल्यास अंतिम निकाल हाती येण्यास उशीर लागू शकतो

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in