आधुनिक भक्तांना ‘चांगुलपणाचा धडा’ शिकवण्यासाठी रामायणाची गरज होतीच..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थर्ड अँगल | विनायक होगाडे

शेवटची फायटिंग सुरुय. विविध बाणांचा उपयोग करून हवेत जाऊन राम आणि रावण एकमेकांवर वार करत आहेत. बाण एकमेकांना धडकून निष्क्रिय होत आहेत. राम आता रावणाच्या मानेवर बाणाने वार करून डोके धडावेगळे करतो, पण ते आपोआपच परत उगवतं. अस कित्येकदा होतं. वरून ही फायटिंग बघणारे देव चिंतेत पडतात आणि एकमेकांत चर्चा करू लागतात. राम थेट रावणाच्या हृदयात का वार करत नाहीत? अशी प्रॅक्टिकल थेअरी मांडतात. तेंव्हा ब्रह्म प्रकट होऊन म्हणतो की, रावणाला हृदयात बाण मारून चालणार नाही हे राम जाणतात. त्यावर, ‘आईंग, असं कसं?’ हा प्रश्न देवांना पडतो. त्यावर ब्रह्मदेव सांगतात की, रावणाच्या हृदयात सीता आहे आणि सीतेच्या हृदयात राम वसला आहे. आणि रामाच्या हृदयात पुन्हा अखिल मानवजात. जर रामाने रावणाच्या हृदयात बाण मारला तर पर्यायाने अखिल मानवजातच नष्ट होण्याचा धोका आहे, असं लॉजिक ब्रह्मदेव देतात.

हे मला माहीतच नव्हतं. जे दाखवलं गेलं आहे ते सांगावं वाटलं इतकंच…आता हे लिहलेलं टर उडवण्यासाठी नाहीय. काही मुद्दे खरंच विचार करण्यासारखे आहेत.

१. रावणाला अंतिमतः मारल्यानंतर त्याची बायको येऊन रडते तेंव्हा राम तिचं सांत्वन करतो आहे. शत्रूला मारल्यानंतर तिच्या बायकोला सांत्वन करणारा राम एकीकडे आणि पाकिस्तानबरोबर मॅच जिंकल्यावर आफ्रिदीच्या आईची गांड काढणारे रामभक्त (?) एकीकडे!

२. रावणाचे निर्दालन केल्यानंतर लंकेची जबाबदारी विभीषणने घ्यावी म्हणून राम त्याला समजवताना दिसत आहे. रावण हरामखोर होता म्हणून लंकेचा द्वेष रामाने केलेला दिसत नाही. याच लॉजीकने जिना हरामखोर होता म्हणून पाकिस्तानमध्ये राहत असणाऱ्या सामान्य लोकांचा द्वेष करण्यात काय अर्थय? अस प्रश्न आपल्याला पडत नाही.

३. रावणाने सीतेला पळवले हे खरे आहे, पण तिच्या मर्जीविरुद्ध काही केलं नाही. रामानेही आपली वानरसेना रावणाच्या चरित्राचे धिंडवडे उडवण्यासाठी ‘ट्रोल आर्मी’ म्हणून वापरली नाही. संपूर्ण रामायणात राम कुठेही रावणाचा द्वेष करताना दिसत नाही.

४. सत्यवचनी राम खोटेपणा करताना दिसत नाही. फेक न्यूज, ट्रोल आर्मी उभी करून असत्याचा सहारा घेताना दिसत नाही. रावणाचे विचार आपल्याला पटत नाहीत म्हणून तो मॉर्निंग वॉकला गेला असताना पाठीमागून बाण मारून षंढपणे त्याला मारताना दिसत नाही. आणि असं करून जबाबदारी झटकताना दिसत नाही.

५. द्वेष न करता धर्मपालन करता येत. रावणाच्या हृदयात सुद्धा येनकेनप्रकारे ‘राम’ म्हणजे चांगुलपणा वसलाच आहे, हे रामाला चांगलं ठाऊक आहे. म्हणूनच राम हा ‘राम’ आहे.

६. आफ्रिदीच्या आईचा द्वेष करणारे, सोनिया-राहुल गांधीचे चारित्र्यहनन करणारे, दाभोलकर-पानसरेंचा षंढपणे खून करणारे आणि त्याचे समर्थन करणारे, ट्विटरवर जाऊन मोदींविरोधी मत मांडलं म्हणून बलात्काराची धमकी देणारे, फेक न्यूज पसरवून द्वेष आणि तेढ निर्माण करणारे आणि एकुणातच ‘द्वेष’ हा भाव बाळगणारे असत्यवादी लोक ‘रामभक्त’ असूच शकत नाही.

विनायक हा पत्रकारितेचा विद्यार्थी असून तो संवेदनशील लेखकही आहे. त्याचं ‘ओह माय गोडसे’ हे पुस्तक २०१९ साली वाचकांच्या भेटीला आलं आहे. याशिवाय ‘फीलिंग अस्वस्थ’ या पुस्तकाचा लेखकही तो आहेच. संपर्क – 9011560460

Leave a Comment