नेताजींच्या आझादहिंद फौजेची कहाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. आपल्या आझाद हिंद फौजेत भारतीय नौजवानांनी हिरीरीने सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले. याच दरम्यान सुभाषबाबूंनी “तूम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा” असे वचन लोकांना दिले. सुभाषबाबूंच्या आवाहनाला भारतभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि शेकडो युवक नेताजींच्या आझादहिंद फौजेत सामिल झाले.

आझादहिंद फौजेची स्थापना १९४२ साली दुसर्या महायुद्धाच्या दरमचयान झाली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि ब्रिटिशांचे साम्राज्य संपवणे हे आझादहिंद फौजेचे उद्दिष्ट होते. सर्वांत प्रथम मोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आझादहिंद फौजेची स्थापना झाली होती. परंतू काही कारणाने ती ढासळली. नंतर ४ जुलै १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस दक्षिण-पूर्व आशियात आले तेव्हा आझांदहिंद चे नेतृत्व लोकांनी त्यांच्याकडे दिले. सुभाषबाबूंनी आझादहिंद फौज पुन्हा भक्कमपणे उभी केली. दुसर्या महायुद्धादरम्यान जपानच्या आर्मीने बंदी बनवलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश सैनिक यांना तुरुंगात जाऊन नेताजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आझादहिंद फौजेत सामिल होण्याचे आवाहन केले. नेताजीच्या नेतृत्वात हजारो ब्रिटीश सैनिक आझादहिंद फौजेत सामिल झाले.

याच सोबत नेताजींनी गावोगावी जाऊन खंदे सैनिक शोधले. त्याना आझादहिंद फौजेत सामिल होण्याचे आवाहन केले. कित्तेक आयाबहिणींनी नेताजींच्या शब्दाखातर आपल्या पोराबाळांना आझादहिंद मधे भरती केले. विशेष बाब म्हणजे नेताजींनी आझादहिंद मधे महिलांचीही एक पलटन बनवली होती. डाॅ लक्ष्मी या त्या पलटनीच्या प्रमुख होत्या. हळूहळू आझादहिंद ची फौज उभी राहीली. शस्त्रे, युद्ध सामग्री यांची जमवाजमव करण्यात आली आणि आझादहिंद इंग्रजांना टक्कर देण्यास खडी झाली

२३ आॅक्टोबर १९४३ रोजी आझादहिंद फौजेने इंग्रज आणि अमेरिका या शत्रू राष्ट्रांविरोधात युद्ध पुकारले. रंगून हे आझादहिंद फौजेचे मुख्य केंद्र बनले. मनिपूर च्या डोंगरी – पहाडी भागातून भारताकधे कूच करण्याचे ठरवून आझाद हिंद फौजेच्या सैन्याने लढाईला सुरवात केली. आझादहिंद फौजेने मोठे यश मिळवले. त्याच्या कारवायांनी इंग्रज सैन्याला सळो कि पळो करुन सोडले होते. ब्रिटिशांची अनेक विमानतळे काबीज करण्यात आझादहिंद फौजेला यश आले. आझादहिंद फौजेचा इतिहास आजरामर राहीला.

टीम, HELLO महाराष्ट्र

Leave a Comment