मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथ विधी गुरुवारी ३० मे रोजी सांयकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन या ठिकाणी पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘पार्टी विथ डिपर्न्स’ या उक्तीला धरून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील मोदी सरकार मध्ये अण्णाद्रमुक आणि नितीश कुमार यांचे जनता दल हे सहभागी नव्हेत. मात्र यावेळी नव्या मंत्री मंडळात त्यांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. तर राम विलास पासवान यांच्या पक्षाच्या वतीने त्यांचे पुत्र चिराग पासवान यांना मंत्री पदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच अरुण जेटली नव्या मंत्री मंडळात असणार का या बद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलीनसली तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

त्याच प्रमाणे मोदींच्या विजयाचे शिल्पकार असणारे अमित शहा देखील मंत्री मंडळात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. त्यांना पहिल्या ४ पैकी एक महत्वाचे खाते देण्यात येवू शकते. तर राजनाथ सिंह, नितिन गडकरी, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर या मंत्र्यांचे मंत्री मंडळातील स्थान निश्चित माणले जाते आहे.

Leave a Comment