औरंगाबाद | शालेय शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षिका निकष निश्चित करण्यात येत आहे शालेय शिक्षण विभागाने शाळा स्थलांतर धोरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यांनी दिलेल्या नवीन निकषानुसार थोर कारण व अत्यावश्यक कागदपत्र असल्यास शाळा स्थलांतर करता येणार आहे.
बऱ्याच शाळांची इमारत धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे. शाळेतील सोयी सुविधा, विद्यार्थी संख्येत वाढ होत असल्यास जागा मालकाकडून भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर भाड्याच्या इमारतीमधून स्वतःच्या जागेत शाळा बांधणे अशा कारणांमुळे शाळेचे स्थलांतर करावे लागत आहे. शाळेचे स्थलांतर केल्यानंतर त्याची माहिती शिक्षा विभागाला द्यावी लागते. शाळा स्थलांतर करण्याबाबत शासनाने नियमावली दिली आहे.
‘विद्यार्थ्यांची स्थलांतर करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, शैक्षणिक व भौतिक सुविधांचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. ज्याठिकाणी शाळा स्थलांतरित केली जाणार आहे. ते ठिकाण प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेकरिता 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर नको असे निर्बंधही घालण्यात आले आहेत. शाळेचे स्थलांतरित झाल्यानंतर पटसंख्या सरासरी हजेरी यामध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही.’ असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव यांनी आदेशात म्हटले आहे.