महाराष्ट्र आजपासून दुपारी चारनंतर बंद; नवे निर्बंध लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्य सरकारने सोमवारपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जमाव व मेळावे, धार्मिक स्थळे, खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भातील नियमांची माहिती देण्यात आलीआहे.

मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यासह राज्यातील ३३ जिल्ह्यांत सोमवारपासून स्तर तीनचे निर्बंध असतील. राज्य सरकारने नव्याने मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार १०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर बंदी असेल, तर बांधकामाच्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांहून अधिक संख्येने काम करता येणार नाही.

अत्यावश्यक दुकाने सकाळी 9 ते 4 आणि इतर दुकाने  सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 4 पर्यंत चालू राहतील

राज्यात सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल.

शनिवारी आणि रविवारी मात्र हे बंद असेल

लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक

अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.

कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील

मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल.