न्यूझीलंड क्रिकेटला धक्का!! दिग्गज खेळाडूची निवृत्तीची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरने निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय रॉस टेलरने तब्बल 17 वर्ष न्यूझीलंड क्रिकेटची सेवा केली. बांगलादेश विरुद्धच्या आगामी मालिकेनंतर टेस्ट क्रिकेटमधून तर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विरुद्धच्या सीरिजनंतर वन-डे क्रिकेटमधून रिटायर होणार असल्याचे टेलरनं जाहीर केले.

रॉस टेलर याने ट्विट करत म्हंटल की, आज मी मायदेशातील उन्हाळी हंगाम संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणार असल्याची घोषणा करतोय. बांगलादेश संघाविरुद्ध २ कसोटी सामने, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड संघाविरुद्ध होणारे ६ वनडे सामने. १७ वर्ष मला पाठिंबा दिल्यामुळे तुमचे आभार. देशासाठी खेळणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे

रॉस टेलरची क्रिकेट कारकीर्द-

रॉस टेलर हा न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो. तब्बल 110 कसोटी सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केलं. टेलरनं 110 टेस्टमध्ये 44.87 च्या सरासरीनं 7584 रन केले आहेत. यामध्ये 19 शतक आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेट मध्येही देशाकडून सर्वाधिक 8581 धावांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेट मध्ये त्याने 21 शतके झळकावली आहेत.

You might also like