Tuesday, March 21, 2023

रॉस टेलरच्या बॉसगिरीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड विजयी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |टी-२० मालिकेत व्हाईटवॉश मिळाल्यानंतर चवताळून उठलेल्या न्यूझीलंड संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दिलेल्या ३४८ धावांचा सहज पाठलाग करत विजय मिळवला. न्यूझीलंडने निर्धारित लक्ष्य ४ गडी आणि ११ चेंडू राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने निर्धारित ५० षटकांत ४ गडी गमावून ३४७ धावसंख्या फलकावर लावली. भारतातर्फे श्रेयस अय्यरने शतक (१०३) तर लोकेश राहुल (८८) आणि विराट कोहलीने (५१) अर्धशतक झळकावले. कमी लांबीच्या मैदानाचा भरपूर फायदा दोन्ही संघातील खेळाडूंनी करून घेतला.

३४८ धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. गपटील आणि निकोलस यांनी संयमी खेळी करत ८५ धावांची भागीदारी केली. यानंतर लॅथम आणि रॉस टेलर यांनी डाव सावरत संघाला २५० धावांचा टप्पा गाठून दिला. दोघांनीही भारतीय गोलंदाजांचे अक्षरशः वाभाडे काढले. यामध्ये रॉस टेलर हा अधिक आक्रमक खेळी करत होता. शेवटच्या काही षटकांत धावगती वाढवण्याच्या नादात न्यूझीलंडने काही बळी झटपट गमावले. मात्र रॉस टेलरने एका बाजूने किल्ला लढवत आपलं शतक पूर्ण करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. टेलरने या सामन्यात ८४ चेंडूत १०९ धावा केल्या.

- Advertisement -

भारताने आज सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांना संधी दिली. लागोपाठ ५ टी-२० सामने गमावल्यानंतर न्यूझीलंडला हा विजय दिलासा देणारा ठरला आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा