Nexon EV Max : एका चार्जमध्ये 437 किमी धावणार Tata ची ‘ही’ गाडी, किंमत किती असेल ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tata Motors कडून नुकतीच Nexon EV Max ही गाडी लाँच केली गेली आहे. या गाडीच्या सुरुवातीची किंमत 17.74 लाख रुपये (एक्स-शोरूम ऑल इंडिया) ठेवली गेली आहे. या गाडीमध्ये नवीन Nexon EV Max मध्ये हाय व्होल्टेज Ziptron टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

Nexon EV Max XZ+ आणि Nexon EV Max XZ+ Lux या दोन प्रकारांमध्ये ही कर उपलब्ध करण्यात येईल. ही गाडी इंटेन्स टील, डेटोना ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइट या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. स्टॅण्डर्ड म्हणून ड्युअल टोन बॉडी कलर उपलब्ध असेल. त्यांची किंमत 17.74 लाख ते 19.24 लाख रुपये दरम्यान आहे. 14.54 लाख ते 17.15 लाख रुपये किंमतीच्या Nexon EV चे नवीन मॉडेल स्टॅण्डर्ड कॅटेगिरीच्या तुलनेत जास्त महाग असतील. मात्र हे लक्षात घ्या की वर नमूद केलेल्या सर्व किंमती या एक्स-शोरूमच्या आहेत.

2022 Tata Nexon EV Max: All new features discussed in detail | Electric  Vehicles News

फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, Tata Nexon EV Max ला नवीन इंटेरिअर, हवेशीर फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जर, डिस्प्लेसह ज्वेलेड कंट्रोलर, एअर प्युरिफायर, स्मार्टफोन वॉच इंटिग्रेशन आणि क्रूझ कंट्रोल, असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने, यामध्ये 4 डिस्क ब्रेक, ESP, हिल होल्ड, हिल डिसेंट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज, इमर्जन्सी स्टॉप लाईट, रोलओव्हर मिटिगेशन, ब्रेक डिस्क वाइपिंग, ISOFIX आणि इतर फीचर्स समाविष्ट आहेत.

Long-range Tata Nexon EV to debut in India by April | NewsBytes

या गाडीच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास, ती 140 किमी प्रतितास या वेगाने चालवता येईल. तसेच या गाडीची इलेक्ट्रिक मोटर 143 PS कमाल पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क देते. यामध्ये 40.5 kWh ची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी त्याच्या आधीच्या बॅटरीपेक्षा 33 टक्के जास्त बॅटरी पॉवर देते. एका चार्जमध्ये ही गाडी 437 किमी चालू शकेल.

Tata to Launch Upgraded Tata Nexon EV With Longer Range In April 2022 |  Spinny Blog

याचा बॅटरी पॅक 3.3kWh चार्जरद्वारे 15-16 तासांत तर 7.2kWh युनिटवरून 5-6 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. यामध्ये 7.2kW AC फास्ट चार्जर देण्यात आला आहे. याच्या चार्जिंगच्या वेळेबद्दल बोलायचे झाले तर ते केवळ 6.5 तासांतच पूर्णपणे चार्ज होऊ शकते. तर, कमर्शिअली वापरल्या जाणार्‍या 50kW DC चार्जरमुळे, ते केवळ 56 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी Tata Motors च्या वेबसाईटला भेट द्या :  https://nexonev.tatamotors.com/

हे पण वाचा :

Mukesh Ambani च नाही तर त्यांचे शेजारीही आहेत अब्जाधीश, त्यांच्या शेजारी कोण-कोण राहतात ते पहा

Cardless Cash Withdrawl : आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, संपूर्ण प्रक्रिया पहा

Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद

Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात

JioPOS Lite App : Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!